Ad will apear here
Next
काळोखातील सावली
‘काळोखातील सावली’ ही आयडा बॅरेटो यांची लघुकादंबरी जागृत आदिशक्तीबद्दलची आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने ई-बुक स्वरूपात ती प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा अल्प परिचय...
.........
‘काळोखातील सावली’ ही एक काल्पनिक लघुकादंबरी आहे. कधी कधी एखादी आराधना मनःपूर्वक केल्याने एखादी आदिशक्ती जागृत होते. या जागृत झालेल्या आदिशक्तीचे बरे-वाईट परिणाम होतात. सावलीदेवी ही अशीच एक आदिशक्ती आहे. ती जागृत असल्यामुळे तिचा कोप झाल्यावर ती किती विनाशकारी होऊ शकते, याचे वर्णन ‘काळोखातील सावली’ या लघुकादंबरीत आले आहे. 

एकलव्य पर्वताच्या गुहेत राहणारी सावलीदेवीच्या कृपेमुळे वांझ स्त्रियांना मुले होतात. त्यामुळे ती लोकांमध्ये पूज्य आहे. परंतु याच लोकांमुळे तिचे वेगळेच असे एक अस्तित्व जागृत होते. तिच्या या बदललेल्या जागृत अस्तित्वाचा भयंकर परिणाम एका सामान्य कुटुंबावर कसा होतो, याची कथा म्हणजे ‘काळोखातील सावली’ ही लघुकादंबरी.

वळचणीच्या सावल्या, जाधवाचा वाडा, तांबड्या आजीचे सारवलेले अंगण, सोनसळी, शंखातून उमटलेला ध्वनी, सातमाईंचे रान या कादंबऱ्यादेखील आयडा बॅरेटो यांनी लिहिल्या आहेत. 

(‘काळोखातील सावली’ या कादंबरीचे ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(आयडा बॅरेटो यांच्या अन्य कादंबऱ्या खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZXTCI
Similar Posts
सातमाईंचे रान ‘सातमाईंचे रान’ ही आयडा बॅरेटो यांनी लिहिलेली कादंबरी बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केली आहे. खोतांचे जागृत दैवत असलेल्या सातमाई हा कादंबरीचा विषय आहे. लेखिकेला आलेल्या अद्भुत अनुभवावर आधारलेल्या या कादंबरीत विविध मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे चित्रण आले आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
शंखातून उमटलेला ध्वनी ‘शंखातून उमटलेला ध्वनी’ ही आयडा बॅरेटो यांची लघुकादंबरी व्यक्तीमधील दोन अस्तित्वांवर आधारलेली आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने ई-बुक स्वरूपात ती प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा अल्प परिचय...
‘रीडिंग वॉल’वर मोफत आस्वाद घ्या अमूल्य साहित्याचा! पुणे : एका अभूतपूर्व संकटामुळे निर्माण झालेल्या संक्रमणकाळाचा अनुभव सध्या सारे जग घेत आहे. या कठीण काळातून तरण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने धडपड करतो आहे. जगण्याची ही धडपड सुकर करण्याचे, तिला दिशा दाखवण्याचे काम करतात चांगले विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन. पुस्तके हा या दोन्हींचा मुख्य स्रोत आहे
जोवरी हे जग, तोवरी गीत रामायण : अभिवाचन - डॉ. प्रतिमा जगताप (व्हिडिओ) एक एप्रिल १९५५ रोजी आकाशवाणीवरून गीत रामायणाच्या प्रसारणाला सुरुवात झाली. गदिमा, बाबूजी या जोडीच्या या दैवी आविष्काराने मराठी रसिकांच्या मनात कायमचे घर केलेले आहे. या गीत रामायणाबद्दलच्या काही गोष्टी सांगणारा लेख पुणे आकाशवाणीच्या निवृत्त वरिष्ठ निवेदिका डॉ. प्रतिमा जगताप यांनी ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या पुस्तकात लिहिला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language